Surprise Me!

आता सुरतमध्ये रंगणार ‘मिस वॉव सौंदर्यस्पर्धा 2017 | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

मिस वॉव ही सौंदर्यस्पर्धा 2014 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून दरवर्षी ती सौंदर्यवतींची स्पर्धा घेत आली आहे. फॅशन, जीवन शैली आणि करमणूक क्षेत्रातील समकालीन आणि आधुनिक प्रतिभेचा शोध घेत, त्याला वॉव करून देण्याची प्रक्रिया पार पाडत, हे आयोजन केले जाते. या सौंदर्यस्पर्धेच्या माध्यमातून महिलांचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता लोकांपुढे येते. मिस वॉवसाठीची ऑनलाईन नोंदणी अजूनही सुरू आहे. विजेत्यांना मुकुटाचा मान तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्यांना फॅशन आणि मनोरंजन विश्वात अधिक चांगले भवितव्यही प्राप्त होते, असे उद्गार मिस वॉव 2017 चे संस्थापक ओर्नोब मोइत्रा यांनी काढले.मिस वॉवचा विस्तार हा संपूर्ण भारतभर झालेला आहे. यावेळी तृतीयपंथींप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या व्यासपीठा चा वापर व्हावा, असा विचार पुढे आला. मिस वॉवमध्ये सामाजिक भान राखत, तसे पाऊल उचलले जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. २०१५ पासून आयोजकांनी सामाजिक उपक्रम राबविले आहेत की, ज्यांत पाण्याची बचत, तंबाखूविरोधी मोहीम आणि डिस्लेक्सिक मुलांच्या मदतीसाठीच्या मोहिमा राबविल्या गेल्या. मिस वॉव २०१७ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार ही स्पर्धा २४ डिसेंबर रोजी सुरत येथे होत आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon